ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण

views

05:08
आज लोकसंख्या अगदी झपाटयाने वाढते आहे. त्यामुळे घनकचरा, सांडपाणी, वेगवेगळी प्रदूषके हे घटकही वाढत आहेत. त्यामुळे रोगराई पसरत आहे व पर्यावरणाचा ऱ्हासही मोठया प्रमाणात होताना दिसतो आहे. ज्या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आहे अशा ठिकाणी ही समस्या खूप मोठी आहे. या समस्यांचे जर योग्यवेळी निराकरण केले नाही तर सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल. कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती अशा माध्यमातून या समस्येवर बऱ्याच प्रमाणात मात करता येते. मात्र जर हा कचरा खूप मोठया प्रमाणावर जमा होत असेल तर नेमकी या कचऱ्याची व्हिल्हेवाट कशी लावली जाते? हा प्रश्न आपल्याला पडतो. नाही का?