ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

स्वच्छ तंत्रज्ञान

views

03:32
आधुनिक काळात मानवाने तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती केली आहे. त्याचे फायदेही आहेत. मात्र ज्या वेगाने प्रगती झाली त्याच वेगाने पर्यावरणाचे प्रदूषणही झाले आहे. तर आता आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून भू व जलप्रदूषण कसे नियंत्रणात ठेवले जाते ते समजून घेऊ. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवांमध्ये नैसर्गिकरित्याच आढळून येते. सूक्ष्मजीवांच्या या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतर केले जाते. काही सूक्ष्मजीव इंधनांतून गंधक काढून टाकतात. हलक्या प्रतीच्या धातुंकामधून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या साहाय्याने या धातूंचे झिरपण्या अगोदरच संयुगात रूपांतर केले जाते.