ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

प्रोबायोटिक्स

views

04:50
आता आपण प्रोबायोटिक्सविषयी माहीती घेऊया. मुलांनो, प्रोबायोटिक्स म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी वापरलेले सजीव/सूक्ष्मजीव. प्रोबायोटिक्स खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत कारण, ‘प्रोबायोटिक्स’ प्रकारच्या पदार्थात लॅक्टोबॅसिलस जीवाणू घातलेले असतात. त्यामुळे अन्न अधिक पोषक बनते. अन्नमार्गात असणाऱ्या क्लॉस्ट्रिडीअम या घातक जीवाणूंचा नाश हा प्रोबायोटिक्समुळे होतो. ते आपल्या आतड्यातील जीवनसत्त्वे संश्लेषित करणाऱ्या जीवाणूंची वाढ करतात. प्रोबायोटिक्समुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक्षमताही वाढते.