ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची

सूक्ष्मजीव व शेती

views

03:02
सूक्ष्मजीव व शेती यांचा अगदी जवळचा संबंध आहे. वनस्पतींची वाढ होण्यासाठी मातीतील सूक्ष्मजीव मदत करत असतात. वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर काही कडधान्ये ह्या शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये रायझोबिअम हा जीवाणू राहतो. हे जीवाणू रोपट्याला मातीतील व हवेतील नायट्रोजनपासून नायट्रेट्स, नायट्राईट्स व अमिनो आम्ले पुरवित असतात. त्या बदल्यात रोपट्यांकडून कर्बोद्काच्या स्वरुपात ऊर्जा व राहण्यासाठी मुळावरील गाठीत जागा मिळवतात. अॅनाबेना, नॉस्टॉक व अॅझिटोबॅक्टर सारखे जीवाणू मातीत राहून कार्य करत असतात. अशा जीवाणूंमुळे रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात. म्हणून नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू उपयुक्त असतात.