संख्याज्ञान

सहा अंकी संख्यांची ओळख

views

3:04
सहा अंकी संख्यांची ओळख आता आपण सहा अंकी संख्यांचे वाचन कसे करावे ते पाहू. शिक्षक – मला सांगा एखाद्या चार चाकी गाडीची अंदाजे किंमत किती असू शकेल? विद्यार्थी – अंदाजे सहा – सात लाख असेल. आता हे लाख कसे तयार होतात ते आपण पाहू. 999 + 1 किती होतात ? वि: 1000 एक हजार होतात. जसे आपण 999 मध्ये 1 मिळवला तर 1000 झाले तसेच 99000 नव्याण्णव हजारात 1000 हजार मिळवले तर 1 लाख होतात .म्हणजेच मला सांगा 1 लाख म्हणजे किती हजार ? वि: 99 + 1 = 100 हजार म्हणजे 1 लाख. शि: अगदी बरोबर. आता या 1 ची पुन्हा गम्मत पहा हा. 999 मध्ये 1 मिळवला तर 1000 होतात हे आपण पाहिले आता जर आपण 9999 मध्ये 1 मिळवला तर 10000 होतात. यालाच दशहजार म्हणतात. आणि असे दशहजार जर आपण 10 वेळा घेतले तरीही आपली संख्या ही 1,00,000 च होणार. आहे की नाही गम्मत? आता पुन्हा तिसरी गम्मत पाहूया. जर तुम्ही 99,999 ही संख्या घेतलीत आणि जर यामध्ये 1 मिळवलात तरीही तुमची येणारी संख्या ही 1,00,000 च असेल.