संख्याज्ञान

खेळण्याचा खेळ

views

2:16
फासा घेऊन खेळण्याचा खेळ. मुलांनो, तुम्ही सापशिडीच्या खेळातील फासा पाहिला आहे का? वि: हो... मग मला सांगा त्यावर किती ते किती अंकांचे गोळे असतात. वि: बाई शून्य ते सहा. शि: अगदी बरोबर तर आज आपण याच फाशाच्या साहाय्याने सात अंकी संख्या तयार करूया. यासाठी आपल्याला 2 विद्यार्थ्यांची गरज आहे. तुम्ही यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांमध्ये हा खेळ खेळू शकता. तर सोनू आणि यश तुम्हा दोघांपासून आपण सुरवात करू. हा पहा आपण तक्ता तयार केला आहे. प्रथम तुम्ही फासा फेकायचा आहे. मग त्यावर असणारा अंक तुम्ही तुमच्या नावापुढील कोणत्याही चौकटीत भरा. सर्व चौकटी भरल्यानंतर आपण पाहू सर्वात मोठी संख्या कोणाची आहे ते? सोनू : बाई, मी सुरवात करते. हा पहा माझा पहिला अंक आला आहे 3 तो मी दशकाच्या घरात लिहिते. यश : बाई, माझा पहिला अंक आला आहे 2 तो मी एककाच्या घरात लिहितो. सोनू : माझा अंक आला आहे 5 तो मी हजाराच्या घरात लिहिला यश : माझा अंक आला आहे 6 तो मी दशहजाराच्या घरात लिहिला . तर अशा प्रकारे तुम्हा दोघांचेही अंक सर्व रकान्यात भरून झाले आहेत. आता सोनू तू वाच बरं तुझी संख्या किती झाली आहे. सोनू: बाई माझी संख्या झाली आहे 32,47,534. आणि यश तुझी संख्या किती झाली आहे? यश : बाई माझी संख्या झाली आहे 21,65,432 तर या दोघांपैकी सोनू ची संख्या जास्त मोठी आहे म्हणून या खेळात सोनू जिंकली आहे. अशा पद्धतीने आपण उलटे सुद्धा खेळू शकतो. म्हणजे ज्याची संख्या सर्वात लहान तो जिंकणार. मात्र खेळाचे नियम सर्व सारखेच राहतील.