संख्याज्ञान

सात अंकी : संख्या ओळख, वाचन व लेखन

views

3:37
सात अंकी : संख्या ओळख, वाचन व लेखन : सात अंकी संख्यांची ओळख करण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवू. समजा एखाद्या सहकारी बँकेकडून प्रत्येकी 1,00,000 रु. प्रमाणे 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. तर बँकेने एकूण किती रुपये दिले? पहा, एका शेतकऱ्याचे कर्ज 1,00,000 रू. आहेत. आणि असे एकूण 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले म्हणून एकूण रू, झाले 1,00,000 × 10 = 10.00,000 दहा लाख रू. तर ही झाली आहे आपली सात अंकी संख्या दशलक्ष. आतापर्यंत आपण लक्षीच्या स्थानापर्यंत मांडणी केली होती. कारण त्या सर्व संख्या सहा अंकी होत्या. पण आता तर ही संख्या ७ अंकी आहे. मग हिची मांडणी कशी करणार? तर यासाठी आपल्याला लक्षीच्या डावीकडे एक स्थान वाढवावे लागेल. त्याचे नाव आहे दशलक्ष. आणि त्या स्थानात हा सातवा अंक लिहावा लागेल पाहा: तर ही झाली आपली संख्या दशलक्ष 10,00,000.