संख्याज्ञान

संख्येचे विस्तारित रूप व अंकांची स्थानिक किंमत

views

3:40
संख्येचे विस्तारित रूप व अंकांची स्थानिक किंमत : समजा आपल्याला 27,65,043 या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत काढायची आहे तर ती कशी काढणार? पहा आपण प्रथम या संख्येची मांडणी करू. प्रत्येक अंक त्याच्या स्थानात ठेवू. तर मला सांगा या संख्येत एकक कोणता आहे वि: 3 शि: बरोबर. आणि दशक आहे 4. 4 दशक म्हणजे 40. शतकाच्या स्थानात कोणती संख्या आहे का? वि: नाही बाई. मग शतकात किती लिहिणार वि: शून्य. आता हजाराच्या घरात किती आहेत? तर 5. म्हणजेच याची किंमत झाली 5000. दशहजाराच्या घरात आहेत 6 म्हणजे हे झाले 60,000. लक्षाच्या घरात आहेत 7 म्हणजे हे आहेत 7,00,000. आणि शेवटी दश लक्षाच्या घरात आहेत 2 म्हणजे हे झाले 20,00,000. तर अशा प्रकारे आपल्याला अंकांची स्थानिक किंमत मिळाली आहे. आपल्याला आणखी एक सोपी पद्धत वापरता येईल. ती म्हणजे प्रथम अधोरेखित अंक कोणता आहे ते पहा त्याच्या नंतर उजवीकडे किती अंक आहेत ते मोजा व तेवढे शून्य त्या अंकाच्या पुढे लिहा.