संख्याज्ञान

संख्यांचा लहान मोठेपणा

views

4:52
आता आपण सहा किंवा सात अंकी संख्यांचा लहान – मोठेपणा कसा ठरवायचा हे पाहू. अशा संख्यांचा लहान मोठेपणा ओळखताना डावीकडून सुरवात करावी. प्रथम दोन्ही संख्यांचे दशलक्ष स्थान पाहू. ज्या संख्येच्या दशलक्ष स्थानातील अंक मोठा असेल ती संख्या मोठी असेल. जर दोनही संख्येचे दशलक्ष स्थानचे अंक सारखे असतील तर मग लक्षस्थानचे अंक पाहावेत. यामध्ये जो अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते.