आपत्ती व्यवस्थापन

प्रस्तावना आपत्ती

views

3:58
आपत्ती व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती जाणून घेवूयात. मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित असे प्रकार आपत्तीचे आहेत दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट, हल्ले, जाळपोळ, अपघात या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. तसेच दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, त्सुनामी, वादळे या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. आपण वृक्षतोड केली नाही, तर पाऊस नियमित पडेल आणि दुष्काळासारखी आपत्ती टाळली जाईल. म्हणजेच काही आपत्ती अशा असतात की ज्या आपण टाळू शकतो तर काही आपत्ती टाळणे शक्य नसते. अशा आपत्तींसाठी आपल्याला दक्षता घेणे खूप गरजेचे असते. भूकंप किंवा त्सुनामी येणे आपण टाळू शकत नाही. पण असे झाल्यास किंवा होण्याच्या आधी काय दक्षता घ्यावी याची माहिती असणे निश्चितच गरजेचे असते. काही आपत्ती आपण टाळू शकतो तर काही आपत्ती आपण टाळू शकत नाही त्याकरिता दक्षता घेणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखून आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोलाचा वाटा उचण्याचा प्रयत्न करावा.