आपत्ती व्यवस्थापन

खुल्या मैदानात वीज पडण्याचे प्रमाण सर्वाधिक

views

2:43
दुष्काळाची लोकांना जाणीव करून देण्यासाठी “नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूपखूप” अशी घोषवाक्ये तयार करून, वेगवेगळी चित्रं काढून प्रभातफेरी मार्फत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करता येईल.पण याव्यतिरिक्त पाण्याचा नियोजनपूर्वक वापर केला पाहिजे. म्हणजे पाणी जपून वापरले पाहिजे. शॉवरखाली आंघोळ न करता, एक बादलीत अंघोळीला पाणी घ्यावे. सतत नळ चालू ठेवून कपडे भांडी न धुता एका बादलीत पाणी घेऊन भांडी धुवावीत. शिवाय भांडी- कपडे धुतलेले पाणी फेकून न देता अंगणात टाकण्यासाठी किंवा टॉयलेटमध्ये टाकण्यासाठी वापरावे.जगभरामध्ये वीज पडून जीवित हानी झाल्याचे प्रमाण जरी कमी असले, तरीही यामध्ये मृत्यू न झालेल्या लोकांच्या जीवनावर दीर्घकालीन परिणाम होतात. वीज पडल्यावर काही लोक जखमी होतात; काही भाजतात; काही अपंग होतात. काहींना तर हार्ट अॅजटॅक येतो. पण अशा वीज प्रभारित व्यक्तींवर जर लगेच इलाज केला तर त्यांचे प्राण वाचवता येतात. ज्या – ज्या ठिकाणी वीज कोसळली आहे, त्या ठिकाणांचा अभ्यास केला असता असे आढळून आले आहे की जास्तीत जास्त विजा या खुल्या मैदानात पडल्या आहेत. आणि सर्वात कमी वीज पडण्याचे प्रमाण हे झाडाखाली आणि पाण्याजवळ आहे. तसेच या दुर्घटना नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना घडल्या आहेत.वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल?1) विजा कडाडत असताना मैदानात किंवा झाडाखाली उभे राहू नये. तसेच उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.2) विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका.3) गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका.4) दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.5) एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका.6) दोन व्यक्तींमध्ये अंदाजे १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.7) प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. 8) मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका. 9) पायांखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.10) दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेऊन तळपायांवर बसा.11) पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.12) पक्के घर सर्वांत सुरक्षित ठिकाण असते. म्हणून आवश्यकता असल्यास आपल्या घरावर तडितरक्षक बसवून घ्या. अशाप्रकारे तुम्ही विजेच्या तडाख्यापासून स्वत;ला सुरक्षित करू शकता.