आपत्ती व्यवस्थापन

वीज पडणे

views

2:21
सुरुवातीला पाऊस सुरू होतो. नंतर पाऊस सुरू असताना अचानक एखादी लक्ख प्रकाशाची रेषा आकाशात चमकते. आणि खूप जोराने आवाजही होतो.आपल्या आकाशात ढगांसोबत हवा देखील असते. आकाशात जेव्हा ढग आणि हवा यांचे घर्षण होते तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित होतात. आणि खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित होतात. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील धनप्रभारापेक्षा खूप जास्त असतो, अशावेळी तेथे विरुद्ध प्रभार तयार होतात. मग या विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगांवरील ऋणप्रभार जमिनीकडे ओढला जातो. ही घटना एक सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात घडते. अशावेळी प्रचंड विद्युतप्रभार निर्माण होतो आणि या विद्युतप्रभारामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनीऊर्जा निर्माण होते. यालाच वीजनिर्मिती असे म्हणतात. तसेच याला वीज चमकणे असेही म्हणतात.आकाशात चमकणाऱ्या सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. तर 95 % विजा या आकाशातच असतात. म्हणजेच आपल्यापर्यंत किंवा जमिनीपर्यंत केवळ 5% विजा पोहोचतात. तसेच विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगांत किंवा ढग आणि जमिनीदरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरणात दर सेकंदाला 40 विजा चमकतात.विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा खरोखरीच जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली असलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज होतो.