आपत्ती व्यवस्थापन

भूकंप

views

3:08
ज्वालामुखीप्रमाणे भूकंप ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंपात मोठया प्रमाणात जमिनीला भेगा पडतात.भूकंप म्हणजे शब्दशः जमिनीचे कंपन होणे किंवा जमीन दुभागणे होय. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते. त्याचेच रूपांतर भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाल होते. त्यामुळेच जमीन थरथरणे, हलणे वा भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात.भूकंप आल्यावर स्वत:च्या बचावासाठी काय करावे? आणि काय करू नये?1) भूकंप जाणवू लागताच मोकळ्या मैदानावर जावे.2) मजबूत टेबल किंवा एखाद्या पलंगाच्या खाली आश्रय घ्यावा. म्हणजे वरून छताचा काही भाग कोसळला तरी तुम्ही सुरक्षित राहाल.3) घरातील एखाद्या दरवाजाच्या चौकटीखाली उभे राहावे..4) काच, खिडक्या आणि भिंतींपासून दूर राहावे.