आपत्ती व्यवस्थापन

इतिहासात डोकावताना

views

3:17
दुष्काळ पडणे ही काही आजची घटना नाही. तर ती इतिहासकाळातही घडत होती. शिवाजीमहाराज व छत्रपती शाहूमहाराजांच्या काळातही दुष्काळ पडत होता. त्या दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. त्या काळातही पिण्याच्या पाण्याचे, अन्नाचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न होते. म्हणून अशा संकटांवर मात करण्यासाठी शिवाजीमहाराज व छत्रपती शाहूमहाराजांनी अनेक योजना राबविल्या होत्या. त्यांतील पाणीपुरवठा व पाणीसाठ्याच्या योजना आजच्या परिस्थितीतही आदर्श आहेत.येणाऱ्या संकटांना व आपत्तींना तोंड देण्यासाठी आपणही अशा योजना तयार करू शकतो, ज्या आपल्या जीवनासाठीच नाही, तर समाजासाठी उपयुक्त ठरतील. औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मलिक अंबरने नहर म्हणजेच कालवा योजना राबविली. पिण्याच्या पाण्याचा तो कालवा हे एक त्याकाळातील उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे आताही सिंचन प्रकल्प, पाणी साठवा पाणी जिरवा, कालव्यांची योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी काय करावे?दुष्काळाची लोकांना जाणीव करून देण्यासाठी “नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूपखूप” अशी घोषवाक्ये तयार करून, वेगवेगळी चित्रं काढून प्रभातफेरी मार्फत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करता येईल. पण याव्यतिरिक्त पाण्याचा नियोजनपूर्वक वापर केला पाहिजे. म्हणजे पाणी जपून वापरले पाहिजे. शॉवरखाली आंघोळ न करता, एक बादलीत अंघोळीला पाणी घ्यावे. सतत नळ चालू ठेवून कपडे भांडी न धुता एका बादलीत पाणी घेऊन भांडी धुवावीत. शिवाय भांडी- कपडे धुतलेले पाणी फेकून न देता अंगणात टाकण्यासाठी किंवा टॉयलेटमध्ये टाकण्यासाठी वापरावे.