परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक

views

3:01
सूर्य हा कोणत्याही परिसंस्थेला ऊर्जा पुरवत असतो. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. हीच ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. परंतु, यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणूनच ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे असे म्हटले जाते. उत्पादकांपासून भक्षकापर्यंत ऊर्जा प्रत्येक पोषण पातळीवरून पुढच्या पातळीत संक्रमित होते. सर्वोच्च भक्षक मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा पुरवली जाते. मृत शरीराचे विघटन हे बुरशी आणि जीवाणू करतात. ते मृत अवशेषांपासून अन्न मिळवतात. सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या कार्बन पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी, माती यामध्ये मिसळतात. आणि पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात. म्हणून ऊर्जा सर्वोच्च भक्षकात न अडकता संक्रमित होते.