परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

नायट्रोजन चक्र

views

4:30
आता आपण नायट्रोजन चक्राविषयी माहिती घेणार आहोत. वातावरणातील नायट्रोजनचा वातावरणाकडून जमिनीकडे, जमिनीकडून वनस्पतींकडे, वनस्पतींकडून प्राण्यांकडे, प्राण्यांकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून पुन्हा वातावरणाकडे असा चक्राकार प्रवास सतत सुरु असतो. नायट्रोजनच्या या प्रवासाला नायट्रोजन चक्र म्हणतात. वनस्पतींना जमिनीतील क्षार स्वरूपाचा नायट्रोजन हा एकमेव स्त्रोत वापरता येतो, सर्वच सजीवांना नायट्रोजन आवश्यक असतो. हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे भौतिक व जैविक प्रक्रियेद्वारे होत असते. अॅनाबेना, नॉस्टॉक, अॅझोटोबॅक्टर, क्लॉस्ट्रीयम व रायझोबिअम हे जीवाणू मातीत आढळतात. ते नायट्रोजनच्या स्थिरीकरणास मदत करतात.