परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

अन्नसाखळी

views

03:23
आता आपण अन्नसाखळी यांविषयी माहिती घेऊ. अन्नसाखळीत एक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. परिसंस्थेतील एक सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते याला अन्नसाखळी म्हणतात.सौरऊर्जेवर गवत व गवतावर नाकतोडा अवलंबून आहे. तर नाकतोड्याचा अन्न म्हणून बेडकाला उपयोग होतो. बेडकाचा अन्न म्हणून सापाला उपयोग होतो. तर सापाचा अन्न म्हणून उपयोग ससाणा नावाचा पक्षी करतो. या अन्नसाखळीमध्ये नाकतोडा हा प्राथमिक भक्षक आहे. तर नाकतोडयाला खाणारा भक्षक बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. साप तृतीय भक्षक तर ससाणा हा पक्षी सर्वोच्च भक्षक आहे. हे प्राणी मृत झाल्यावर जीवाणू किंवा बुरशी हे मृतोपजीवी त्याचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना विघटक असेही म्हणतात.