परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

पोषण पातळी

views

4:56
अन्नसाखळीतील प्रत्यके पातळी ही पोषण पातळी असते. अन्नसाखळीतील प्रत्येक पातळीला ‘पोषण पातळी’ असे म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्नसाखळीत अन्नघटक व ऊर्जेचे प्रमाण निम्नस्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्यांनी कमी होत जाते. आपल्या रोजच्या जेवणात भात, वरण, तूप, लिंबू, बटाटा, भाजी, मुगाची उसळ इत्यादी अन्नपदार्थ असतात. वरण हे डाळींपासून, भात तांदळापासून व उसळ मुगापासून बनवलेले पदार्थ आहेत. बटाटे हे वनस्पतीच्या खोडात साठवलेले अन्न आहे. तर लिंबू हे फळ आहे. यावरील अन्नपदार्थामध्ये तूप सोडून बाकी सर्व पदार्थ हे वनस्पतीपासून मिळतात. वनस्पती ही उत्पादक आहेत. मानव हे पदार्थ खातो म्हणून मानव हा प्राथमिक भक्षक आहे.तसेच जे लोक मांसाहार करतात म्हणजेच मासे, कोंबडी किंवा बकऱ्याचे मांस खातात असे लोक हे द्वितीय भक्षक ठरतात. बोकड हा प्राणी शाकाहारी म्हणजेच प्राथमिक भक्षक असतो. काही मासे हे प्लवक खातात म्हणून ते मासे शाकाहारी असतात. तर या माशांना मोठे मासे किंवा प्राणी खातात. त्यामुळे हे मासे किंवा प्राणी मांसाहारी असतात. कोंबडी मिश्राहारी असते. त्यामुळे अशा माशांना किंवा कोंबडीना खाणारे लोक हे तृतीय भक्षक असतात.