परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

कार्बन चक्र

views

4:56
जैव-भू-रासायनिक चक्रातील कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे चक्र आहे. कार्बन चक्र हे सजीवांसाठी खूप महत्त्वाचे असते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपातील कार्बन हरित वनस्पतींकडे जातो.वनस्पतींकडून अन्नाच्या स्वरुपात प्राण्यांकडे जातो.वनस्पती आणि प्राण्यांकडून परत वातावरणात जातो. कार्बनच्या अशा चक्राकार भ्रमणाला कार्बन चक्र म्हणतात. पृथ्वीवर कार्बनचक्र अविरत चालू असते. अजैविक कार्बनच्या अणूंचे प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनचक्रीकरण होते. त्यामुळेच जैव-भू-रासायनिक चक्रामध्ये कार्बन चक्र महत्त्वाचे आहे. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बनडायऑक्साइड co2 चे कर्बोदकात रूपांतर करतात. प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे व शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्याकडे व मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होतो. जैविक कार्बन मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित झाल्यानंतर सर्वोच्च भक्षकाच्या मृत्यूनंतर जीवाणू व बुरशी या पदार्थाचे विघटन करतात. त्यामुळे कार्बनडायऑईड co2 हा वायू बाहेर टाकला जातो व तो वातावरणात मिसळून पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे सजीवांकडून दुसऱ्या सजीवांकडे कार्बनचे अभिसरण चालूच असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व निसर्गातून कार्बन परत सजीवाकडे संक्रमित होतो. अशा प्रकारे कार्बनचे चक्र अविरत चालूच असते.