परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

जैव-भू-रासायनिक चक्राचा अर्थ

views

3:58
पोषणद्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला ‘जैव-भू-रासायनिक चक्र’ असे म्हणतात. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमांतून हे चक्र अविरत चालू असते. या प्रक्रियेमध्ये जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जावहनाच्या पातळीवर अवलंबून असते. जैव-भू-रासायनिक चक्राचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, वायुचक्र, अवसादन किंवा भूचक्र. वनस्पतींना पाणी, कार्बनडायऑक्साइड, फॉस्फरस, पोटॅशिअम, नायट्रोजन अशा पोषणद्रव्यांची गरज असते. तर प्राण्यांना कार्बोहायड्रेटस, प्रोटीन्स, मेद, जीवनसत्त्वे अशी पोषणद्रव्ये आवश्यक असतात. उत्पादक व भक्षकांच्या मृतावशेषातील मूलद्रव्ये विघटक पुन्हा मातीत मिसळतात. पोषणद्रव्याचा हा चक्रीय प्रवाह जैव-भू-रासायनिक चक्रामुळेच होत असतो. अशा प्रकारे जैव-भू-रासायनिक चक्र महत्त्वाचे कार्य पार पाडत असते.