असहकार चळवळ

सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान

views

3:55
सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान : गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोकचळवळीत व पर्यायाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे, तिच्या मतामध्ये बदल करणे म्हणजे सत्याग्रह होय. जी व्यक्ती सत्याग्रहाचा मार्ग अवलंबते, त्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये, अशी गांधीजींची शिकवण होती. हिंसा म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा पशुपक्षी यांना इजा पोहचविणे किंवा त्यांना मारणे होय. तर असत्य म्हणजे खोटे बोलणे. सत्याग्रही व्यक्तीने नेहमी खरे बोलावे अशी गांधीजींची शिकवण होती.पुढे गांधीजींच्या सत्याग्रह या तत्त्वाचा वापर भारतातीलच नव्हे, तर जगातील अनेक देशांतील जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी केला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे, लढणारे मार्टिन ल्युथर किंग यांनी या तत्त्वाचा वापर केला. तसेच दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावरही गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. त्यांनीही द. आफ्रिकेतील वर्णभेद संपविण्यासाठी सत्याग्रहाच्या या मार्गाचा अवलंब केला.