असहकार चळवळ

जालियनवाला बाग हत्याकांड

views

3:48
जालियनवाला बाग हत्याकांड: हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अत्यंत कटू पर्व म्हणजे जालियनवाला बाग प्रकरण हे याच काळात घडले. या घटनेने इंग्रजी राज्यकर्त्यांच्या चारित्र्याला भयंकर मोठा कलंक लावला. यातून ब्रिटिशांचा अमानुषपणा जगासमोर आला.रौलट कायद्याविरुद्ध संपूर्ण देशात लढा पुकारलेला होता. परंतु या लढ्याचे प्रखर स्वरूप पंजाबमध्ये दिसून येत होते. पंजाबी नोकरशाही व पंजाबी जनता यांचा संघर्ष या कायद्याने तीव्र झाला होता. पंजाबमधील अमृतसर हे शहर या चवळीचे प्रमुख केंद्र बनले होते.१३ एप्रिल १९१९ या दिवशी अमृतसरच्या जनतेने रौलट कायद्याचा निषेध व हिंदी नेत्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित केली होती. २०,००० लोक सभेला आले होते. सभेच्या पटांगणाकडे जाण्यासाठी फक्त एक चिंचोळा बोळ होता. बाकी सर्व बाजूंनी पटांगण बंदिस्त होते. पटांगणातून बाहेर पडण्यासाठी त्या चिंचोळ्या बोळाव्यतिरिक्त इतर रस्ता नव्हता. अशा परिस्थितीत सभा चालू असताना जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. त्याने आपल्या गाड्या चिंचोळ्या, अरुंद अशा बोळाच्या ठिकाणी आणून उभ्या केल्या व बाहेर जाण्याचा रस्ता अडविला. आणि नि: शस्त्र, निरपराध व असहाय्य अशा जनतेवर कोणतीही पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला. बंदुकीच्या १६०० फेरी झाडल्यानंतर दारूगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री – पुरुष मृत्युमुखी पडले. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारली गेली. संचारबंदी म्हणजे कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर पडू शकणार नव्हती. लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणे म्हणजे संचारबंदी होय. या संचारबंदीमुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरूगांत डांबले. त्यावेळी पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर होते. या संपूर्ण हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर ओडवायर हाच जबाबदार होता. देशभरात रौलेट कायद्याचा व जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध होऊ लागला.