असहकार चळवळ

अहमदाबादचा कामगार लढा

views

4:11
अहमदाबादचा कामगार लढा: मुलांनो, इ.स.१९१४ ते १९१८ या चार वर्षादरम्यान पहिले महायुद्ध झाले. यात इंग्लंडचा विजय झाला असला तरी नुकसानही भरपूर झाले होते. त्याची भरपाई करण्यासाठी इंग्रजांनी आपल्या ताब्यातील वसाहतींमध्ये करवाढ केली. याचा फटका भारतालाही बसला. या काळात देशात महागाई प्रचंड वाढली होती. त्यामुळे गुजरातमधील अहमदाबादेतील कापड गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली. परंतु गिरणी मालकांनी त्यांच्या या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार गिरणी कामगारांनी संप व उपोषण केले. संप म्हणजे कामच करायचे नाही. आणि उपोषण म्हणजे अन्न, पाणी यांचा त्याग करून नुसते बसून राहायचे. गांधीजीही या गिरणी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. गिरणी कामगारांपुढे गिरणी मालकांनी शेवटी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ करून दिली.रौलट कायद्याविरुद्ध लढा: देशात सशस्त्र क्रांतिकारकांच्या व इतर राजकीय नेत्यांच्या चळवळी बंगालच्या फाळणीनंतर वाढल्या होत्या. त्याचबरोबर सरकारची दडपशाही वाढली होती. भारतीयांच्या मनातील हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षते खाली एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारसीनुसार १७ मार्च १९१९ मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला ‘रौलट कायदा’ असे म्हणतात. या कायद्याने भारतीयांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. या कायद्यांमुळे हिंदी समाज खवळून उठला. भारतभर संतापाची लाट उसळली. लोकांच्या मनात इंग्रज सरकारविरुद्ध असंतोषाची भावना निर्माण झाली. भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ किंवा ‘Black Bills’ असे संबोधले.