असहकार चळवळ

स्वराज्य पक्ष

views

2:52
स्वराज्य पक्ष :- म.गांधीजींच्या आदेशानुसार वेगाने चाललेली असहकार चळवळ एकदम थांबविली गेली. ही गोष्ट राष्ट्रीय सभेतील पं.मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांसारख्या जेष्ठ नेत्यांना आवडली नाही. राजकीय चळवळ सतत जागृतावस्थेत असली पाहिजे असे या मंडळींचे मत होते. अशा परिस्थितीत स.१९२३ साली कायदेमंडळाच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्या निवडणुका राष्ट्रसभेने लढवाव्यात आणि कायदेमंडळात जाऊन राष्ट्रसभेच्या नेत्यांनी तेथे सरकारची अडवणूक करावी व देशात सतत जागृती राखावी असे नेहरू व दास यांना वाटत होते. पुढे त्यांच्या या विचारातूनच त्यांनी राष्ट्रीय सभेच्या अंतर्गतच १९२२ मध्ये ‘स्वराज्य पक्ष’ स्थापन केला. १९२३ च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदे – मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदनमोहन मालवीय, लाला लजपतराय, न.चिं. केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती. त्यावेळी स्वराज्य पक्षाने कायदेमंडळ प्रवेशाचा व कायदेमंडळातील सरकारच्या अडवणुकीचा निश्चित कार्यक्रम लोकांसमोर ठेवला. ज्यामुळे लोकांच्या मनात स्वराज्य चळवळीचे प्रेम सतत जागृत ठेवण्यात यश मिळाले. तसेच या वेळी कायदे मंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली. स्वराज्य पक्षाच्या सदस्यांनी सरकारच्या अन्याय्य धोरणांना कडाडून विरोध केला. स्वराज्य पक्षाच्या सदस्यांनी भारतात येणाऱ्या काळात जबाबदार राज्यपद्धती म्हणजेच, लोकशाही शासन व्यवस्था स्थापन करावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी इंग्रज सरकारने हिंदी प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद भरवावी, अशी मागणी केली.