असहकार चळवळ

सायमन कमिशन

views

5:25
सायमन कमिशन :- सन १९१९ मध्ये हिंदुस्थानला इंग्लंड पार्लमेंटच्या माँटेग्यू – चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. या सुधारणा कशा काय आहेत याचे परीक्षण करून नव्या कोणत्या सुधारणा आणायच्या हे ठरविण्यासाठी इंग्रज सरकारने १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या समितीत सात सदस्य होते. परंतु यात एकही भारतीय सदस्य नव्हता. यात सर्वच्या सर्व सातही सदस्य एकजात गोरे होते. हिंदुस्थानची भावी राज्यघटना कशा प्रकारची असावी, हे ठरविणाऱ्या समितीत एकही हिंदी माणूस नसावा ही गोष्ट हिंदी नेत्यांना संतापजनक वाटली. म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. १९२८ साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा, ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्याविरुद्ध लोकांनी निदर्शने केली. ‘सायमन गो बँक, सायमन परत जा’ अशा घोषणांनी त्याचे स्वागत होत असे. सर्व देशभर तीव्र स्वरूपाची आंदोलने व निषेध होऊ लागले. लाहोर येथे सायमन कमिशन गेले असता लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी तो अडवून निदर्शकांना भयानक मारहाण केली. लालाजींच्या छातीवर लाठया बसल्या. साँडर्स या उद्दाम पोलिस अधिकाऱ्याने हा लाठीहल्ला केला. या हल्ल्यानंतर निषेधसभेत लालाजी म्हणाले की, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राजाच्या शवपेटीवर एकेक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसांतच लालाजी मृत्यू पावले.