मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

सिद्दीविरुद्ध मोहीम

views

3:32
सिद्दीविरुद्ध मोहीम: समुद्रातील जंजिरा किल्ला सिद्दी बंधूंच्या ताब्यात होता. त्याच्या चारही बाजूने पाणी होते. सिद्दी मराठ्यांच्या प्रदेशावर धाडी टाकून जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत होते. त्यांच्या या कृत्याचे वर्णन करताना बखरकार म्हणतात की, ‘घरात जैसा उंदीर, तैसा राज्यास सिद्दी.’ म्हणजे जसा एखादा उंदीर घराला पोखरतो, नासधूस करतो, त्रास देतो तसा हा सिद्दी स्वराज्याला छळतो आहे. हे सर्व भयानक प्रकार ऐकून महाराजांना खूप राग आला. त्यांनी इ. स. १६८२ मध्ये सिद्दीविरुद्ध मोहीम उघडली. पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम :- संभाजी महाराजांच्या विरुद्ध गोव्याच्या पोर्तुगीजांनी बादशाहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे राजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे ठरविले. त्यांनी इ. स. १६८३ मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठयांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. पोर्तुगीजांनी बाहेरून तोफांचा मारा सुरू केला. काही शत्रू किल्ल्यात शिरले. कंक पिता – पुत्राने पराक्रम गाजवला. मराठयांनी वेढा मोडून काढला.