मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

संभाजी राजांचा मृत्यू

views

3:29
संभाजी राजांचा मृत्यू: औरंगजेब संभाजी महाराजांना नमविण्यासाठी खूप प्रयत्न करीत होता. परंतु त्याला यश येत नव्हते. संभाजी राजांनी औरंगजेबापुढेही आपला स्वाभिमान सोडला नाही. म्हणून औरंगजेबाने अतिशय छळ करून, त्यांचे हाल करून त्यांना मारले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांची भीमा व इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापुर येथे हत्या करण्यात आली. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अतिशय धीराने मृत्यूला सामोरे गेला. छत्रपती राजाराम महाराज :- राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजींचे दुसरे पुत्र होते. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच राजाराम छत्रपती झाले. शिवाजी गेला, संभाजी गेला आता आपण मराठयांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार करू असे औरंगजेबाला वाटू लागले.