मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम Go Back राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण views 3:18 राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण : ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यांतून सुटले व पुढे पन्हाळ्याला गेले. त्यावेळी त्यांच्याबरोबर काही निवडक सहकारी होते. परंतु, मुघलांनी पन्हाळ्यास देखील वेढा दिला. अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले व त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. राजाराम महाराज- प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रुपाजी भोसले इ. विश्वासू लोकांना आपल्याबरोबर घेऊन जिंजीला पोहोचले. मराठयांच्या हालचाली: मुघल शक्तीपुढे रायगड जास्त काळ लढविणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर १६८९ मध्ये रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व पुत्र शाहू यांना कैद केले. तिकडे जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपविली होती. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तुळापुर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढविला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला होता. मराठी सैन्यातील दुसरी सरदारांची फळी अशा रीतीने तयार होऊ लागली. प्रस्तावना सिद्दीविरुद्ध मोहीम आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट संभाजी राजांचा मृत्यू राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण जिंजीला वेढा महाराणी ताराबाई मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त