मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट

views

3:09
आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट: औरंगजेबाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला मराठयांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने मराठयांविरुद्धची मोहीम थांबविली. त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाहीकडे वळविला. औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही ही राज्ये जिंकून घेतली. त्यासाठी त्याला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. या दोन्ही राज्यांची संपत्ती व त्यांचे लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाच्या संपत्तीत व लष्करात आणखीनच भर पडली. त्यामुळे औरंगजेबाची स्थिती होती त्यापेक्षा मजबूत झाली. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार: संभाजी महाराज छत्रपती झाल्यापासून त्यांना कित्येकदा एका वेळेस अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. महाराजांनी युद्धाच्या दरम्यान आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे जरासुद्धा दुर्लक्ष केले नाही. त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायव्यवस्था व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. संभाजी महाराजांना संस्कृत भाषेसह अनेक भाषा येत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यांचे सार आपल्या ‘बुधभूषण’ या ग्रंथात मांडले आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र त्यांचे कार्य व शिक्षण, राजाचे सल्लागार, लष्कर, राजाची कर्तव्ये व हेर व्यवस्था इत्यादी विषयी माहिती दिली आहे.