मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

जिंजीला वेढा

views

2:35
जिंजीला वेढा:रायगड ताब्यात घेतल्यावर बादशाहाने झुल्फिकारखानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. त्याला फ्रेंचांची साथ मिळाली. राजाराम महाराज परत अडचणीत सापडले. जिंजी किल्ला कठीण आणि लढवायला मजबूत होता. महाराजांनी स्वराज्यात सांगावा पाठविला आणि दिवस रात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी जिंजीला पोहचले. त्यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. मराठयांनी जिंजीचा किल्ला सुमारे आठ वर्षे निकराने लढवला. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर झुल्फिकारखानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला.