मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त

views

2:42
मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त : महाराणी ताराबाईंनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे चालविला. एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळातील स्त्रियांनीही त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा एवढे महान कार्य त्यांनी केले. मराठ्यांना पराभूत करणे त्याला अखेरपर्यंत जमले नाही. अशा परिस्थितीतच औरंगजेब बादशाहाचा इ. स. १७०७ मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम समाप्त झाला. आपण या पाठात घेतलेल्या माहितीनुसार मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा, हाव आणि मराठयांच्या मनात असणारी स्वातंत्र्याची इच्छा व आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. यामध्ये मराठयांचा विजय झाला. इतकेच नव्हे, तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मराठयांनी केला. नंतर मराठयांनी दिल्लीची गादी आपल्या नियंत्रणाखाली ठेवली. जवळपास सर्व हिंदुस्थानाचा कारभार पाहिला व त्याचे रक्षणही केले. त्यामुळे मध्ययुगातील अठरावे शतक हे शतक मराठ्यांचे मानले जाते. महाराजांच्या शूर वारसदारांनी संपूर्ण हिंदुस्थानच आपल्या वर्चस्वाखाली आणला.