अन्नघटक

प्रस्तावना

views

4:55
मुलांनो, आपण मागील इयत्तेत आहार व अन्नघटक यांची माहिती घेतली होती. आपण नियमितपणे आपल्या आहारात चपाती, भाकरी, भाजी, डाळ-भात यांसारख्या पदार्थाचा समावेश करतो. त्यातून आपल्या शरीराला विविध कार्ये करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. तसेच अन्नपदार्थांत वेगवेगळ्या प्रकारची चव व वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. ते घटक आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करतात. या घटकांनाच अन्नघटक असे म्हणतात. या अन्नघटकांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. मुलांनो, तुम्ही मागील इयत्तेत शिकला आहात की अन्नपदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्नघटक असतात. या अन्नघटकांविषयी अधिक माहिती आपण या पाठात पाहूया. १) कर्बोदके :- कर्बोदके हे कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनपासून बनलेले संयुग आहे. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते. सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. कर्बोदके असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात शर्करा तयार होऊन शरीराला ऊर्जा मिळते. कर्बोदके, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांच्या एकत्रितपणाने बनतात. या तिन्ही प्रकारांची आपण माहिती घेऊ. प्रथम पिष्टमय पदार्थाची माहिती घेऊ. पिष्टमय पदार्थ :- चला तर मग मुलांनो पिष्टमय पदार्थ ओळखण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया.