अन्नघटक

तंतुमय पदार्थ

views

3:20
तंतुमय पदार्थ : कर्बोदके ज्या तीन घटकांपासून बनतात. त्यातील तिसरा घटक म्हणजे तंतुमय पदार्थ होय. हे तंतुमय पदार्थ कोणते ते आपण पुढील प्रयोगाच्या साहाय्याने पाहूया. . मुलांनो तंतुमय पदार्थांपासून ऊर्जा निर्माण होत नसली, तरी ते शरीरासाठी अत्यावश्यक असतात. कारण आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले, तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठता म्हणजे अपचन होणे, पोट साफ न होणे, यांसारखे त्रास सुरू होतात. म्हणून शरीरात तंतुमय पदार्थ असणे खूप गरजेचे असते. पिठातील कोंड्याशिवाय फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. मुलांनो, आतापर्यंत आपण अन्नपदार्थांमध्ये असणारे तीन प्रकारचे पदार्थ पाहिले. पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ या तिन्ही पदार्थांना एकत्रितपणे ‘कर्बोदके’ असे म्हणतात. थोडक्यात, पिष्टमय पदार्थ + शर्करा + तंतुमय पदार्थ= कर्बोदके होय. कर्बोदकांचा मुख्य उपयोग शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे हा असतो.