अन्नघटक

प्रश्नोत्तरे

views

4:38
शि : मुलांनो मी तुम्हांला काही प्रश्न विचारतो. त्यांची तुम्ही उत्तरे द्या. शि: नवीन टीव्ही, फ्रीज, पंखे, काचेचा बल्ब, आरसा, ग्लास यांसारख्या फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूंच्या खोक्यांमध्ये आतून पुठ्ठे, थर्माकोल किंवा फुगीर प्लास्टिक का लावलेले असते? जरा डोके चालवा: शि: फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्त्याच्या खाली काय ठेवतात? असे का करतात? वि: सर खलबत्त्यातील पदार्थ कुटताना खालच्या बाजूस धक्के जाणवतात. त्यामुळे फरशी फुटू शकते. त्यामुळे खलबत्ता आणि जमीन या दोन्हींच्यामध्ये टॉवेलची घडी किंवा जाड गोणपाठ ठेवल्यास खलबत्त्याच्या आघातापासून फरशीस संरक्षण मिळून फरशीची हानी होत नाही. शि: बरोबर! अशाच प्रकारे आपल्या शरीरात चरबीची गादी काम करीत असते. आपल्या हाडांचे बाहेरून होणाऱ्या आघातांपासून व मारापासून ही चरबीची गादी संरक्षण करत असते.