अन्नघटक

स्निग्ध पदार्थ

views

3:43
स्निग्ध पदार्थ : शि : मुलांनो, आतापर्यंत आपण कर्बोदकांबद्दल माहिती घेतली. आता आपण अन्नघटकाचा पुढील प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजे स्निग्ध पदार्थ होय. त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहू. मुलांनो, आपण पाहिले, की तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. कारण स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. तेल लावल्यावर कागद अर्धपारदर्शक झाला. म्हणजेच, कागद अर्धपारदर्शक होणे, ही अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे. अन्नातील स्निग्ध पदार्थांपासूनही शरीराला मोठया प्रमाणात ऊर्जा मिळते. या ऊर्जेचे प्रमाण पिष्ट पदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा दुप्पट असते. परंतु मुलांनो आपल्या आहारात स्निग्ध पदार्थ पिष्टमय पदार्थांपेक्षा अगदी कमी प्रमाणात असतात. आपल्या आहारात अनेक प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. मुलांनो, आरोग्य टिकविण्यासाठी विशिष्ट प्रमाणात स्निग्धांशांची गरज असते. पण शरीरातील चरबीचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढले की त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात.