अन्नघटक

शर्करा

views

2:35
शर्करा :- चवीला गोड लागणारा पदार्थ म्हणजे शर्करा होय. साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की, आपण जेवढे पिष्टमय पदार्थ खातो त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंदपणे ज्वलन होते. त्याच्या ज्वलनातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधन म्हणून कार्य करत असते. उदा. उसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात ‘सुक्रोज’ नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिकू अशा फळांमध्ये ‘फ्रुक्टोज’ असते. तर दुधात ‘लॅक्टोज’ शर्करा असते. धान्यातील साखरेला माल्टोज असे म्हणतात. निरनिराळया अन्नपदार्थात विविध प्रकारच्या शर्करा असतात. त्यांच्यापासूनही आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.