अन्नघटक

माहीत आहे का तुम्हांला?

views

4:55
माहीत आहे का तुम्हांला? पदार्थ एक – अन्नघटक अनेक: मुलांनो, आपण अनेक पदार्थ खात असतो. त्यातून वेगवेगळे अन्नघटक आपल्याला मिळत असतात. असे अनेक अन्नपदार्थ आहेत की ज्यातून आपल्याला एकापेक्षा जास्त अन्न घटक मिळत असतात. मघाशी आपण थालीपिठाचे उदाहरण बघितले. अशा पदार्थांची आणखी काही उदाहरणे आहेत. मुलांनो, आपण टीव्हीवर पिझ्झा, कॅडबरी, ज्यूस, कोल्ड्रींक्स यांसारख्या पदार्थाच्या आकर्षक जाहिराती बघतो. त्यामुळे आपणही असे आकर्षक व चटपटीत तयार पदार्थ खातो. परंतु, मुलांनो असे पदार्थ खाण्यापेक्षा आपल्याला संतुलित आहार ज्या पदार्थातून मिळेल असे पदार्थ घरीच तयार करून खावेत. हे कधीही आपल्या शरीरासाठी जास्त चांगले असते. अशा प्रकारे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सर्व प्रकारचे अन्नघटक शरीरास मिळणे अत्यंत गरजेचे असते.