अन्नघटक

जीवनसत्त्वे व खनिजे

views

4:34
जीवनसत्त्वे व खनिजे: मुलांनो कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे अन्नघटक आपल्या शरीरास मोठ्या प्रमाणात लागत असले तरी यांच्याशिवाय आपल्याला इतर काही अन्नघटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज पडते. हे अन्नघटक म्हणजे जीवनसत्त्वे व खनिजे होय. त्यांची माहिती आपण घेऊ. जीवनसत्त्वे :- या जीवनसत्त्वांचे विविध प्रकार असतात. त्यांना इंग्रजी नावे दिली आहेत. उदा. ए.बी.सी.डी,इ आणि के ही मुख्य जीवनसत्त्वे आहेत. या जीवनसत्त्वांची आपल्या शरीराला मोठया प्रमाणात गरज नसली तरी त्यांच्या कमतरतेमुळे गंभीर स्वरूपाचे आजार व दोष निर्माण होतात. उदा. ‘ए’ जीवनसत्त्वाच्या सततच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो. खनिजे:- मुलांनो, आपल्या शरीरास लोह, कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियम व झिंक ही खनिजे आवश्यक असतात. शरीराला या खनिजांची गरज अगदी थोड्या प्रमाणात असली, तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा सहभाग मोठा असतो. उदा. लोह संपूर्ण शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो. लोह आपल्या शरीरातील पेशींमधील महत्त्वाच्या कार्यांना चालना देते.