अन्नघटक

संतुलित आहार

views

4:12
संतुलित आहार :- शि: मुलांनो, मला सांगा मध्यान्ह भोजनात दिले जाणारे अन्न कोणते? वि: सर, आम्हाला मध्यान्ह भोजनात डाळ-तांदळाची खिचडी, कडधान्यांची उसळ यांसारखे अन्न दिले जाते. तसेच काही वेळा केळी, बिस्किटे, उकडलेली अंडी दिली जातात. मुलांनो तुम्ही एखादयाला असे म्हणता, की ‘माझी प्रकृती उत्तम आहे’ तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी काय सांगत असता? तर आपण जेव्हा म्हणतो की, माझी प्रकृती चांगली आहे, याचा अर्थ असा होतो, की आपल्याला आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ इ. कार्ये सहज करता येतील एवढी आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारचे काम करताना थकवा जाणवत नाही. तसेच आपण वारंवार आजारीही पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे या सर्वांचाच शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचे असते. “सर्व अन्नघटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला ‘संतुलित आहार’ असे म्हणतात.” हा संतुलित आहार आपल्याला वेगवेगळ्या अन्नपदार्थांतून मिळत असतो. म्हणून नेहमी सर्व अन्नपदार्थ खावेत. बर मग माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या पाहू!