संच Go Back संयोग संचाचे गुणधर्म views 2:55 आपण संयोग संचाचे गुणधर्म अभ्यासूया. 1) संच A संयोग B = B संयोग A आहे. A ∪ B = B ∪ A 2) जर संच A हा B चा उपसंच आहे तर संच A संयोग B हा संच B आहे. जर A⊆B तर A∪B= B 3) संच A चा उपसंच A संयोग B(A ⊆ A ∪ B), संच B चा उपसंच A संयोग B(B ⊆ A ∪B), 4) संच A व पूरक संच A’ यांचा संयोग संच विश्वसंच आहे. (A∪A’) = ∪ मुलांनो, येथे इंग्रजी अक्षरातील कॅपिटल अक्षर U यू म्हणजे विश्वसंच अभिप्रेत आहे. मात्र संयोगसंचाचे चिन्ह U अक्षर नसून U आकारासारखीच थोडी मोठी पसरलेली आकृती आहे हे लक्षात ठेवा. 5) संच A संयोग A = A आहे. (A ∪ A) = A 6) संच A संयोग रिक्त संच = A (A∪ Ø = A) असे आहेत संयोग संचाचे गुणधर्म. संचातील घटकांची संख्या: आता आपण संचातील घटकांची संख्या म्हणजे काय ते समजून घेऊ. समजा संच A = महिरपी कंसात {3,6,9,12,15} हा दिलेला संच आहे. या संचात 5 घटक आहेत. संच A मधील घटकांची संख्या n(A) अशी दाखवतात. ∴ A संचातील घटकांची संख्या=5 n(A)=5. समजा संच B =महिरपी कंसात {6,12,18,24,30,36} ∴B संचातील घटकांची संख्या n(B)=6 आहे. संच ओळख संच लिहिण्याच्या पद्धती संचांचे प्रकार समान संच वेन आकृती विश्वसंच संचांवरील क्रिया दोन संचांचा संयोग संयोग संचाचे गुणधर्म संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे