गुणोत्तर व प्रमाण

प्रस्तावना

views

5:18
उदाहरण: विमलने तयार केलेले रव्याचे लाडू रुचकर असतात. ती एक वाटी तूप, ३ वाट्या रवा आणि 2 वाट्या साखर घेऊन लाडू बनविते. वरील उदाहरणात रवा आणि साखर यांचे प्रमाण 3:2 किंवा 3/2 आहे. समजा जर लाडवांसाठी 12 वाट्या रवा घेतला तर साखर किती लागेल? गुणोत्तर व प्रमाण: दोन संख्यांच्या गुणोत्तराची संकल्पना तीन किंवा अधिक संख्यांसाठी विस्तारित करता येते. हे समजण्यासाठी वर दिलेले लाडवाचे उदाहरण आपण पाहूया. तूप, रवा आणि साखर यांचे गुणोत्तर 1 : 2 : 3 आहे. ही माहिती एकाच प्रमाणाने दिली आहे. तूप 1k = k वाटी, रवा 3k वाट्या आणि साखर 2k वाट्या असे मानू. आता 12 वाट्या रवा असेल तर लाडवांसाठी किती वाट्या तूप व किती वाट्या साखर लागेल? संकल्पना चार किंवा अधिक बाबींच्या प्रमाणासाठी देखील वापरता येते कसे ते खालील उदाहरणांतून समजून घेऊ. उदा.1) जर a, b, c, d या चार संख्यांचे प्रमाण 2 : 3 : 7 : 4 असे असेल तर त्या संख्या 2m, 3m, 7m, 4m मानू. दिलेल्या माहितीवरून m ची किंमत काढू. उदाहरणार्थ, या चार संख्यांची बेरीज 48 असेल तर त्या चार संख्या काढू. उदा. 2) खताच्या 18 : 18 : 10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18%, फॉस्फरसची संयुगे 18% आणि पोटॅशियमची संयुगे 10% असतात. उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो. तर त्या प्रकारच्या 20 किलोग्रम खतांमध्ये प्रत्येक संयुगाचे वस्तुमान किती असेल ?