गुणोत्तर व प्रमाण

समान गुणोत्तरांवरील क्रिया

views

4:56
आता आपण समान गुणोत्तरांवरील क्रियांचा अभ्यास करणार आहोत. समानतेच्या गुणधर्मांचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरांवर काही क्रिया करता येतात. त्यांचा अभ्यास करू. जर a, b, c, d या धन संख्या असतील तर त्यांसाठी खालील गुणधर्म समजून घेऊ. i) व्यस्त क्रिया: जर a/(b ) = c/(d ) असेल तर b/(a ) = d/c आणि a/(b ) = c/(d ) असेल. ii) एकांतर क्रिया: जर a/(b ) = c/(d ) असेल तर a/(c ) = b/d असेल. iii) योग क्रिया: जर a/(b ) = c/(d ) असेल तर (a+b)/(b ) = (c+d)/d असेल. iv) वियोग क्रिया: जर a/(b ) = c/(d ) असेल तर (a-b)/(b ) = (c-d)/d असेल. v) योग वियोग क्रिया: जर a/(b ) = c/(d ) असेल तर (a+b)/(a- b ) = (c+d)/(c- d), किंवा a≠b, किंवा c≠d असेल.