प्रकाशाचे अपवर्तन

प्रस्तावना

views

5:41
आपल्या सभोवताली घडणाऱ्या सर्व घटना आपण प्रकाशामुळेच बघू शकतो. केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यांसारख्या निसर्गातील विविध किमयांचा आनंद घेऊ शकतो. आपल्या सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार वनसृष्टी, रंगीबेरंगी फुले, दिवसा निळेशार दिसणारे आकाश रात्रीच्या अंधारात आपल्याला चमकताना दिसते. या सर्व गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. कारण दररोज आपण त्या अनुभवतो. प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे होत. प्रकाशाचे परावर्तन कसे होते, परावर्तनाचे नियम आणि प्रकार यांचा अभ्यास केला. वस्तूंच्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाशकिरण त्या पृष्ठभागांवरून परत फिरतात. त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाशकिरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात, त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.पृष्ठभागावर परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात.परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोचली की वस्तू आपल्याला दिसते.