अर्थनियोजन

दलालीवर वस्तू व सेवा कर

views

04:42
दलालीवर वस्तू व सेवा कर: शेअर दलाल त्यांच्या खातेदारांच्या वतीने शेअर्सची खरेदी विक्री करून देण्याची सेवा पुरवतात. दलाली सेवेवरील कराचा दर 18% आहे. वस्तू व सेवा कराव्यतिरिक्त ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर आणखी काही अल्प दराचे कर आहेत. उदा. सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स (STT), SEBI शुल्क, स्टँप ड्युटी इत्यादी. त्याचा आपण या पाठात विचार करणार नाही. फक्त ब्रोकरेजवरील वस्तू सेवा कराचा विचार करणार आहोत.