स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज

स्प्राईटचे आकारमान

views

02:04
याआधी आपण स्प्राईटचा आकार “Grow” आणि “shrink” या कमांडने जास्त व कमी केला. पण जर अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचा आकार जास्त किंवा कमी झालेला दाखवायचे असेल तर “Looks” या ब्लॉकमध्ये दोन वेगवेगळे ब्लॉक पॅलेट आहेत. जसे की आपल्यापासून एखादी दूर अंतरावर असणारी वस्तू किंवा व्यक्ती ही आधी आपल्याला आकाराने लहान किंवा अस्पष्ट दिसते. पण जसजसे अंतर कमी होते तसतशी ती स्पष्ट दिसायला लागते. अॅनिमेट करताना स्प्राइटचे आकारमानही आपल्याला बदलता येते. त्यांचा स्क्रिप्टिंगमध्ये उपयोग करून आपण स्प्राईटचा आकार जास्त किंवा कमी झालेला दाखवू शकतो.