परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह

प्रस्तावना

views

4:39
आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवाला अन्नाची आणि पाण्याची गरज असते. अन्नामुळेच सजीवांच्या सर्व क्रिया व्यवस्थित कार्य असतात. अन्नामुळे सजीवांतील ऊर्जास्तर कायम राहतो. आणि त्यामुळेच सजीव स्वत:च्या सर्व जीवनक्रिया पार पाडू शकतात. एक सजीव हा दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो. मग मला सांगा, एक सजीव दुसऱ्या सजीवांवर कसा अवलंबून असतो? वि: सर, मानव खाण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करतो, बेडूक कीटक खातो, मोठे मासे छोट्या माश्यांना खातात, तसेच जंगलातील वाघ, सिंह इतर प्राण्यांना खातात वनस्पती सजीव असतात आणि त्यांचा उपयोग मानव अन्न म्हणून करतो. अशाचप्रकारे अनेक सजीव हे इतर सजीवांचा अन्न म्हणून उपयोग करत असतात. हे सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. ते एका परिसंस्थेत एकमेकांस साहाय्य म्हणजेच मदत करत असतात. सजीवांमध्ये अशा अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असतात. एक सजीव हा दुसऱ्या सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतो. त्यांच्यामध्ये अन्नसाखळीच असते. तर या पाठामध्ये आपण सजीवांच्या या अन्नसाखळीचा व या परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाहाचा अभ्यास करणार आहोत.