वास्तव संख्या Go Back प्रस्तावना views 4:21 आज आपण एका नवीन संख्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे वास्तव संख्या. मुलांनो, वास्तव संख्याचा ओघळता अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये पाहिला आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण या प्रकरणात घेणार आहोत. वास्तव संख्येची नेमकी व्याख्या काय आहे. ते आता आपण पाहणार आहोत. व्याख्या: “ परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून संख्या समूह तयार होतो. त्या संख्या समूहाला वास्तव संख्या संच असे म्हणतात.” वास्तव संख्या R या अक्षराने दाखवतात. R म्हणजेच परिमेय + अपरिमेय संख्या होत. मुलांनो लक्षात ठेवा की, प्रत्येक परिमेय व अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. खाली एक सारणी दिली आहे, त्यावरून आपल्या हे लक्षात येईल. मुलांनो लक्षात ठेवा की, कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंडित आवर्ती असते. मुलांनो मागील इयत्तेमध्ये खंडितरूप व अखंड आवर्ती याविषयी माहिती जाणून घेतली आहे. त्याची उजळणी म्हणून थोडसं समजून घेवूया. प्रस्तावना अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/q या रुपात मांडणे संख्यारेषेवरील परिमेय व अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या व वास्तव संख्या अपरिमेय संख्याची दशांश रुपात मांडणी संख्या π पाय अपरिमेय संख्याचे गुणधर्म करणी करणीची तुलना सजातीय करणींवरील क्रिया करणीचे परिमेयीकरण छेदाचे परिमेयीकरण