वास्तव संख्या

करणीचे परिमेयीकरण

views

5:58
करणीचे परिमेयीकरण: आता आपण करणीचे परिमेयीकरण कसे करतात ते पाहूया, दोन करणीचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. उदा1) √2 या करणीला √2 ने गुणले असता √(2 x 2) = √4 मिळतात. √4 = 2 ही परिमेय संख्या आहे. म्हणून √2 चा परिमेयीकरण गुणक √2 आहे. उदा2) √2 x √8 हा गुणाकार करा. = √(2 x 8) गुणाकार करूया = √16 वर्गमूळ काढू. = 4 ही परिमेय संख्या आहे. √2 चा √8 हा परिमेयीकरण गुणक आहे कारण √2 x 8√2 = 8 √2 x √2 = 8 x 2 = 16 आहे. छेदाचे परिमेयीकरण करण्यासाठी गुणकाचा उपयोग होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोईचे असते. म्हणून छेदाचे परिमेयीकरण करतात. वर्गकरणीचे द्विपद रूप: मुलांनो, आता आपण वर्गकरणीचे द्विपद रूप बघूया. √5 + √3; 3/4 + √5 ही वर्ग करणीची द्विपद रूपे आहेत. तसेच √5 - √3; 3/4 - √5 ही सुद्धा करणीची द्विपद रूप आहे. द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीतील पदाचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो.