वास्तव संख्या

अपरिमेय संख्याची दशांश रुपात मांडणी

views

5:33
1)2 चे वर्गमूळ:- सर्व प्रथम दोन नंतर दशांश चिन्ह देऊन दोन शून्याचा एक गट याप्रमाणे 2.(00) ̅ (00) ̅ (00) ̅ (00) ̅....असे 4 गट केले. नंतर दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला जी पूर्णांक संख्या असते त्यातून मोठ्यात मोठी वजा होणारी वर्ग संख्या वजा करावी. येथे दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला 2 ही पूर्णांक संख्या आहे. त्यातून 1 ही मोठ्यात मोठी संख्या वजा केली. आणि वरती भागाकारातही 1 लिहिला. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना ज्या अंकाने भागतो, तो अंक डाव्या बाजूच्या अंकात मिळवावा लागतो. येथे सर्वप्रथम 1 ने भाग लावला म्हणून डाव्या बाजूला 1+1=2 असे लिहिले. त्यानंतर दशांशचिन्हानंतर दोन शून्याचा 1 गट ((00) ̅) उरलेल्या वजाबाकीच्या उजव्या बाजूला लिहिला. म्हणजे 100 झाले. आता आपला भाज्य 100 व भाजक डाव्या बाजूला 2 आहे. परंतु 2 च्या बाजूला असा अंक घ्यावा की जो 100 मधून वजा होईल. येथे 2 च्या बाजूला 4 अंक घेतला म्हणून भाजक 24 झाला. आता भागाकाराच्या ठिकाणी वरच्या बाजूला 1 नंतर दशांश चिन्ह देऊन 4 लिहिले. 2) 3 चे वर्गमूळ : वरीलप्रमाणेच इथे भागाकार पद्धतीने 3 चे वर्गमूळ काढले आहे. त्याचे निरीक्षण करा. या दोन्ही उदाहरणांतून समजते की √2 व √3 या संख्या अपरिमेय आहेत म्हणून 1.41421....... आणि 1.732 ..... या सुद्धा अपरिमेय संख्या आहेत. म्हणजेच अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या अपरिमेय असतात.