वास्तव संख्या

अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/q या रुपात मांडणे

views

6:34
आता आपण अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/q या रुपात कशाप्रकारे मांडतात हे पाहूया. उदा1) 0.777. ... (शून्य पूर्णांक आवर्ती सात) हा आवर्ती दशांश अपूर्णांक ( P)/q रूपात लिहा. समजा x = 0.777... (शून्य पूर्णांक आवर्ती सात) म्हणजेच 0.7 आहे. लक्षात घ्या की दशांश चिन्हानंतर किती अंक पुन्हा पुन्हा येतात किंवा कोणते अंक आवर्ती आहेत हे पाहून त्या संख्येला गुणावे. वरील उदाहरणात 7 हा एकच अंक पून्हा पून्हा येतो म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला 10 ने गुणावे लागेल. x = 0.777 म्हणजेच 0.7 ̇ (शून्य पूर्णांक आवर्ती 7) आहे. ------------समीकरण(1) ∴10 x x = 0.7 x 10 = 7.7 ∴10 x = 7.7 आहेत. ----------- समीकरण(2) आता समीकरण (2) मधून समीकरण (1) वजा करूया. 10 x – x = 7.7 – 0.7 ∴ 9 x = 7 ∴ x = ( 7)/9 ∴ 0.777 म्हणजेच ( 7)/9 आहेत.